आज विधानसभेत मराठा आरक्षण तसेच इतर महत्त्वपूर्ण राज्यातील निर्णयांसाठी विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. त्यामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
वाचा…
मराठा आरक्षणाचं वचन महायुती सरकारनं पाळलं!
महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस… #OBC आरक्षणाला धक्का न लावता १० टक्के मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार शपथबद्ध होतंच. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत पटलावर ठेवलेलं मराठा आरक्षण विधेयक बहुमतानं मंजूर झालं. मात्र, विधेयकाला सर्वच विरोधी पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बहुमताने शब्दाऐवजी एकमताने अशी दुरुस्ती सुचवली.
त्यांची ही सर्वसमावेशक भूमिका विशेष उल्लेखनीय! नंतर हे विधेयक विधान परिषदेतही एकमताने मंजूर झालं. याबद्दल दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्ष सदस्यांचे मनापासून आभार.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यासह मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताचंही हे यश आहे. या सर्वांचं अभिनंदन. या आरक्षणामुळे मराठा समाजाचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास निश्चितच होईल, असा ठाम विश्वास महायुती सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून यानिमित्ताने व्यक्त करतो!अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
#MarathaReservation #मराठा_आरक्षण