Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक
2
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

  • उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबरला संविधान मंदिराचे लोकार्पण

मुंबई, दि. १३ : कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण’ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ’ प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी  कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक यावेळी  उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

संविधान मंदिर लोकार्पण सोहळा

राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाचा संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण  देण्यात येणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम

राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे २० सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योगमंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिला स्टार्टअप्सना निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे एक हजार स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

मंत्री  श्री.लोढा म्हणाले की, ‘अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी आपल्या देशाला घडवण्यासाठी आपले योगदान दिले. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो. संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्त्व, येणाऱ्या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहे, भारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.  उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!’

Previous Post

मुंबई महानगर प्रदेशाचा आर्थिक मास्टर प्लॅन : एक सविस्तर विश्लेषण

Next Post

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा –

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा –

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.