ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज
सोलापूर – समाजाला योग्य दिशा आणि संस्कार संतच देत असतात. जेव्हा जेव्हा समाज भरकट असतो तेव्हा तेव्हा संत समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा देतात. धर्म आणि संस्कार टिकवण्याचे जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या सर्व सदस्यांनी संघटीत होऊन एकजुटीने काम केले पाहिजे. वारकरी मेळावा हा सांप्रदायिक विचारांची देवाणघेवाण करणारा मेळावा आहे व वारकरी सेवेसाठी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केले
.
तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी, तरुणाई व्यसनमुक्त करणेसाठी, तरुणांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणेसाठी, ऐतिहासिक वारसा, संस्कृती, परंपरा, ई. विषयावर मंथन करणेसाठी, शहर व जिल्ह्यातील तरुण व महिला भाविकांचे संघटन करणेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने संघटनेच्या चतुर्थ वर्धापना निमित्त डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे 16 सप्टेंबर 20024 रोजी वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रथमता सर्व मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीला हार अर्पण करून व दिप प्रज्वलन करुन राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज म्हणाले, वारकरी मेळावा विचारांची देवाणघेवाण करणारा मेळावा आहे.वारकरी सांप्रदायात विशेष कार्य करण्यासाठी प्रेरणा वारकरी मेळाव्यातून मिळते. प्रत्येकाने अ भा वारकरी मंडळाचे कार्य संघटीत होऊन करणे गरजेचे आहे. प्रत्येक वारकरी हा वारकरी असतो त्यात कोणताही स्त्री पुरुष असा भेदाभेद केला जात नाही. वारकरी संप्रदायाने एक विशिष्ट आचारधर्म स्वीकारलेला आहे. या आचारधर्माची काही वैशिष्ट्ये आहेत, जी प्रत्येक वारकरी जीवाभावाने जपतो. ती सारी वैशिष्ट्ये बघितली की त्यातील सहजता लगेच लक्षात येते. परस्परांसोबत वावरताना वारकरी संप्रदाय कधीही कुठलाही भेदभाव मानत नाही. महिला पुरुष हा भेद वारकरी कधीच पाळत नाहीत. ही समानता काळाची गरज बनली आहे. सत्य, अहिंसा, सेवा, त्याग, दया, शांती या नीतीतत्त्वांना वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्व आहे.या मेळाव्यामध्ये वारकर्यांच्या विविध प्रश्नांवर विचार-विनिमय त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे विचार प्रत्येकाच्या घराघरात कशाप्रकारे पोचवता येतील या विषयावर चर्चा करत मान्यवरांनी मत व्यक्त केले.
व्यासपीठावर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प.बळीराज जांभळे महाराज (राष्ट्रीय सचिव), ह.भ.प.जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), ह.भ.प.मोहन शेळके (प्रदेश सचिव ) , संजय पवार (शहर अध्यक्ष), ह.भ.प. अभिमन्य डोंगरे महाराज ( विश्वहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ), ह.भ.प. ज्ञानेश्वर भगरे (पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष) , पार्वती आवताडे (पंढरपूर विभाग महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), ह.भ.प.काशिनाथ दळवी , ह.भ.प.दगडू डोंगरे (मराठवाडा विभाग उपाध्यक्ष), शुभांगी शेळके (सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा), वैशाली वळसंगकर (महिला शहराध्यक्षा), संगीता आवताडे (मंगळवेढा महिला तालुकाध्यक्षा), निर्मला मिठ्ठा (महिला सहजिल्हाध्यक्षा) श्री मार्कंडेय दिंडी संस्था , उमाबाई साका (शहर सहअध्यक्षा), ह भ प दर्शन ढगे (युवा अध्यक्ष ) संत तुकाराम महाराज पालखी , अच्युत मोफरे महाराज, युवा समिती सोलापूर (शहर व जिल्हा), उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक व वारकरी मंडळी आणि संघटनेचे पदाधिकारी आले होते. विशेष म्हणजे महिला वारकरी मंडळ ही मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार (शहराध्यक्ष ) यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील महाराज यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मोहन शेळके महाराज यांनी मानले.
ज्या व्यक्तींनी वारकरी घडवण्याचे अनमोल कार्य केले आहे. अशा व्यक्तीचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. ते पुढील प्रमाणे
1) ह भ प बळीराम जांभळे महाराज
2) ह भ प पंकज गुंड महाराज
3)ह भ प बाळासाहेब बाबर महाराज (दारफळ बी बी )
4) ह भ प पांडुरंग फलमारी
5) ह भ प मनोज कासार आणि ह भ प काशिनाथ सुरवसे
6) ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ (SRP कॅम्प, सोरेगाव )
तसेच यावेळी कुमार गायकवाड, दत्तात्रय क्षीरसागर महाराज, सचिन गायकवाड , निवृत्ती मोरे , ज्ञानेश्वर चव्हाण महाराज , प्रदीप माने, महादेव वाघमारे महाराज , अभिमान घंटे (तालुका अध्यक्ष ), रामलिंग भगरे , दत्तात्रय तोडमे, संजय केसरे , भाऊसाहेब बेलेराव, शंकर घुले , सुमंत शेळके, गोविंद माने, दादा गायकवाड, जयबा डोंगरे,लिंगराज पल्लोलू, नंदा बेलेराव, सुरेखा साठे, महानंदा पांढरे, मीराताई बोगे, मंगल दीक्षित, सिंधू देसाई,मंगल साळुंखे, इ, पदाधिकारी व अखिल भाविक वारकरी मंडळ महिला व पुरुष सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उत्साह पूर्ण वातावरणात मेळावा संपन्न होऊन पसायदानाने समारोप करण्यात आला.