Friday, May 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Good News! शहरात रात्रगस्त होणार प्रभावी ; लोकाभिमुख कामाची ग्वाही -M.राजकुमार, नूतन पोलीस आयुक्त

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
170
VIEWS
ShareShareShare


सोलापूर (प्रतिनिधी) : प्रोफेशनल पोलीसिंग करीत असताना सोलापूरकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकाभिमुख काम करणार असल्याचे नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व क्राईम असोशिएशनच्यावतीने नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.



पुढे बोलताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, महिलांच्या तक्रारीला प्राधान्य दिले जाईल, त्याचबरोबर रस्त्यावरील गुन्हेगारी (स्ट्रीट क्राईम) कमी करण्यावर भर देणार आहे.
     दरम्यान शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे सांगतानाच त्यांनी वाहतुकीच्या शिस्तीला अडथळा येणारा अटीट्युड चालणार नाही असा इशारा दिला. मोटरसायकल वरील नंबर प्लेटवर दादा, आप्पा, अण्णा, पक्षाचे चिन्ह, समाजाची ओळख पटणारी चिन्ह अशा गोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत याचे भान वाहन मालकांनी ठेवावे. अशा वाहनधारकांवर आता कारवाई सुरू केली असून यापुढील काळात ती कठोर करण्यात येणार असून संबंधित वाहन चालक किंवा मालक यांची संपूर्ण माहिती जमा करण्याचे आदेश संबंधित पोलिसांच्या विभागाला दिले असल्याचेही एम. राजकुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
        वाहन चालकांनी वाहन चालविताना शिस्त मोडली नाही पाहिजे. त्याचबरोबर रिक्षा चालकानीही शिस्तीचे पालन करावे असे आवाहन एम. राजकुमार यांनी केले. सायलेन्सर बदलून चालविण्यात येणारी वाहने, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर, युनिफॉर्म अशा बाबींवर सध्या काम करण्याच्या सूचना पोलिसांना दिले आहेत. परंतु पुढील काळात सूचना किंवा वेळ न देता प्रभावी कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय शहरातील अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी दिले.
        

सध्या सर्वच पोलीस ठाण्यात पेंडिंग अर्ज निकाली काढण्याचे काम तत्परतेने सुरू आहे. सध्या 500 पेक्षा जास्त अर्ज निकाली काढण्यात आलेले असून उर्वरित अर्ज 15 मार्चपर्यंत संबंधितांची बाजू ऐकून घेऊन निकाली काढण्यात येतील असेही आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्राईम असोसिएशनचे अध्यक्ष अमोल व्यवहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सागर सुरवसे, क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्रसार माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते.


प्रभावी रात्रग्रस्त राबविणार…
उत्सव प्रिय असणाऱ्या शहरात रात्रीच अचानक डिजिटल लावले जातात त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे रात्री डिजिटल लावण्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी संबंधित सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी व रात्रगस्तीच्या पथकांना प्रभावीपणे रात्रगस्त राबविण्याच्या सूचना दिले आहेत. डिजिटल लावताना कोणी आढळून आल्यास त्यांची कसून चौकशी करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत.

Tags: M.Rajkumar Police commisioner of solapurSolapur Maharashtra police
Previous Post

मराठ्यांनी रोखला सोलापूर-पुणे महामार्ग ; वारकऱ्यांचाही मोठा सहभाग

Next Post

Live | माझा बळी पाहिजे तर देतो..; मनोज जरांगे पाटील निघाले मुंबईला

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

Live | माझा बळी पाहिजे तर देतो..; मनोज जरांगे पाटील निघाले मुंबईला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.