सोलापूर — शारदीय नवरात्र उत्सव 2024 व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त करिता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले यांच्या निर्देशानुसार इंद्रभवन येथील मीटिंग हॉल येथे नवरात्र उत्सव धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त उपाययोजना करण्यासंदर्भात आज सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आला.
याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका आकुलवार, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी,अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,अनिल चराटे, आरोग्य अधिकारी राखी माने, मंडई अधिक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नवरात्र उत्सव व धम्मचक्र परिवर्तन निमित्त शक्ती देवी मिरवणूक मार्ग तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निघणाऱ्या मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांचे फांद्या कट करणे, मोकाट जनावराची बंदोबस्त करणे, मिरवणूक मार्गावर अडथळा करणारे खाजगी केबल वायर काढणे, आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणे, जुन्या व नवीन बांधकामाची कच्चे साहित्य रस्त्यावर असलेले इतरत्र हलवणे, मिरवणूक मार्गावरील ड्रेनेज लाईन तसेच सांडपाणी रस्त्यावर येणार नाही याची व्यवस्था करणे तसेच लाईटची व्यवस्था करणे. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये अद्यावत असे असलेले अग्निशामक दलाचे गाडी उपलब्ध करून देणे इत्यादींचा संदर्भात व राहिलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.