MH 13 News Network
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सद्यस्थितीत चर्चेत असणारे नाव म्हणजे महादेव कोगनुरे आहेत. कोगनुरे यांनी मतदार संघात होम टू होम पॅटर्न राबवला असून घराघरात यंत्रणा पोहचली आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून कोगनुरे यांनी आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. घरोघरी केलेल्या प्रचारास त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
कोगनुरे हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. आधी केले मग सांगितले..! या उक्तीप्रमाणे त्यांनी कोरोना काळात एखाद्या देवदूता सारखे कार्य केले असे मत अनेक नागरिक आणि ग्रामस्थ व्यक्त करत असून रक्तदान ऑक्सिजन पुरवठा या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवली होती. आजही त्यांच्या कार्यालयात आलेला गरजू व्यक्ती रिकाम्या हाताने जात नाही अशी ख्याती त्यांनी मिळवली आहे.
गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्याने पालकांशी एक नातेसंबंध निर्माण करण्याचे कार्य त्यांनी साधले आहे. जिल्हा परिषद शाळेला प्रत्यक्ष भेटी दिल्याने सर्वसामान्य नागरिकांशी मोठा संपर्क निर्माण त्यांनी केला आहे.
कृषी मेळावे, महिलांसाठी रोजगार निर्मिती, विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याची शैली, ऑफिसमध्ये सातत्याने वाढत जाणारी नागरिकांची गर्दी, यामुळे स्वपक्षात आणि प्रस्थापित राजकारण्यांमध्ये चर्चा होत आहे.
एक शांत स्वभावाचे, मितभाषी, गर्व नसलेले सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा असणारे महादेव कोगनुरे हे शहरातील आणि ग्रामीण दक्षिण भागातील नागरिकांना जवळचेच वाटत आहेत. अशी प्रतिक्रिया होम टू होम प्रचारावेळी उमटत आहे.सागर सिमेंटच्या माध्यमातून युवकांना रोजगारांच्या अनेक संधी त्यांनी तात्काळ मिळवून दिल्या. रोजगार मिळाल्यामुळे स्वयंपूर्ण झालेले संपूर्ण कुटुंब हे महादेव कोगनुरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत आहेत.
होम टू होम प्रचाराचा काँग्रेसला लाभ..!
लोकसभा निवडणुकीत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी एम के फाउंडेशन आणि त्यांची टीम मोठ्या जोमाने उभी होती. शहर आणि दक्षिण मतदार संघातील मतांची जुळणी करण्यामध्ये कोगनूरे यांचा मोठा वाटा होता. पुन्हा एकदा जोमाने काँग्रेस सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असल्याने काँग्रेसला याचा फायदाच होत आहे अशी चर्चा पक्षांतर्गत केली जात असल्याचे बोलले जात आहे.
मतदार हाच खरा राजा..!
होम टू होम प्रचार करताना त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्याने त्यावर उपाय करण्याचा मी तातडीने प्रयत्न करतो. फाउंडेशनच्या माध्यमातून समस्या दूर करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातात. पक्षाचे मोठे पाठबळ खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री आणि माझे आदर्श सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे मिळत आहे. मतदार हा राजा असतो याचा अनुभव गृह भेटीवेळी येतोय. सर्वसामान्यांसाठी पक्षांचा आदेश घेऊन मी जोमाने काम करणार.
महादेव कोगनुरे,
काँग्रेस नेते इच्छुक उमेदवार