MH 13News Network
सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ मोठा चर्चेत आहे. सध्याचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधातील भाजपातील काही मंडळी थेट सागर बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेली. एकमुखाने त्यांनी सुभाषबापू यांना बदला त्यांच्या ऐवजी कोणताही उमेदवार द्या आम्ही प्रचारात आघाडी घेऊ असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
आज गुरुवारी दक्षिण मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून मुंबईमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघ मधील काही ज्येष्ठ मंडळी आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या विरोधात एकवटली असून आजच ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असून सायंकाळी बैठक ठरली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
शिष्टमंडळात हे होते उपस्थित..!
माजी नगरसेवक श्रीनिवास करली, माजी नगरसेवक अशोक बिराजदार-पाटील,श्रीनिवास बुरुड, वैभव हत्तुरे, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, अनिल चव्हाण, इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे,सचिन चव्हाण, श्रीशैल (मामा) हत्तुरे, आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सागर बंगला येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली.
निवेदन स्वीकारले पण बैठकीसाठी..!
सोलापुरातील दक्षिण मतदार संघातील नाराज असणाऱ्या भाजप नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले.मात्र, रतन टाटा यांचे निधन झाल्यामुळे पुढच्या आठवड्याची भेटीची वेळ दिली असल्याची माहिती शिष्टमंडळांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह फडणवीस हे रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दक्षिण मतदार संघातील शिष्टमंडळाची आजची भेट रद्द करण्यात आली. पुढील आठवड्याची वेळ देण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर मध्ये उमेदवार बदलासाठी आम्ही सामूहिकरीत्या भेट घेतली आहे. पुढील आठवड्यात बैठक घेऊ. असे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले असल्याची माहिती ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना दिली.