Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पुढच्या वर्षी दांडिया महोत्सवात माधुरी दीक्षितला आणणार.! पहा.. कोणी दिलं आश्वासन..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
पुढच्या वर्षी दांडिया महोत्सवात माधुरी दीक्षितला आणणार.! पहा.. कोणी दिलं आश्वासन..!
0
SHARES
506
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

उत्साह पूर्ण वातावरणात रंगला दांडिया महोत्सव पारंपरिक वेशभूषेत दोन हजार महिलांची हजेरी दांडिया आणि गरब्याच्या तालावर थिरकले सोमनाथ वैद्य..!

कोणतीही अडचण असू द्या, या भावाला हाक द्या : ॲड.सोमनाथ वैद्य

सोलापूर : उत्साह पूर्ण वातावरणात मांगल्य मंगल कार्यालयात दांडिया जलसा महोत्सव रंगला. पारंपारिक वेशभूषेत सुमारे 2 हजार महिला व मुलींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. दरम्यान, कोणतीही अडचण असू द्या, या भावाला हाक द्या. मी नेहमी मदतीसाठी तत्पर राहील, अशी ग्वाही स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक एड. सोमनाथ वैद्य यांनी यावेळी दिली. त्यासोबत मी आमदार झाल्यास पुढच्या वर्षी माधुरी दीक्षितला दांडिया महोत्सवात आणण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित महिला भगिनींना दिले. तेव्हा एकच जल्लोष झाला.

ग्रोथ डान्सिंग स्कूल प्रस्तुत दांडिया जलसा 2024 हा कार्यक्रम रविवारी मांगल्य सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲड. सोमनाथ वैद्य यांची उपस्थिती होती.

उदे ग अंबे उदे… आई राजा उदे उदे चा नारा देत दांडिया जलसा २०२४ची सुरुवात झाली. प्रारंभी ॲड.सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले.

श्रीफळ वाढवून या दांडिया कार्यक्रमास प्रारंभ झाला.या दांडियास महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दांडिया आणि गरब्याच्या तालावर हजारो महिला व युवती थिरकल्या. सर्वांसोबत सोमनाथ वैद्य यांनीही ठेका धरला.

या दांडिया मध्ये सुमारे 2 हजार हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. विविध गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य करीत उत्तरोत्तर दांडियाची रंगत वाढवली. ग्रोथ डान्सिंग स्कूल प्रस्तुत सर्व संयोजक सहकाऱ्यांनी नेटक्या पद्धतीने नियोजन केले होते.

आरती आणि भोंडल्याने या दांडियाची सुरुवात झाली. पारंपरिक पेहरावात महिला व मुलींनी बहारदार गाणी अशा उल्हास पूर्ण वातावरणात हा दांडिया रंगत गेला. वाद्यवृंदांचा ठेका आणि नेटक्या संयोजनामुळे या कार्यक्रमाला बहर आला होता. वैविध्यपूर्ण नेपथ्य, आकर्षक रोषणाई, जोशपूर्ण गाणी आणि उत्तम वाद्यवृंदाने सर्वांना आकर्षित केले. नव्या वळणाच्या दांडिया ठेका सादर करून उपस्थितांनी धमाल उडवून दिली.

मराठमोळी संस्कृती जोपासत पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळून सर्वांचे लक्ष वेधले. या दांडिया जलसा महोत्सवात पारंपरिक वेशभूषा खास आकर्षण ठरली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अभय दिवाणजी आणि व्यंकटेश पटवारी हे सहकुटुंब उपस्थित होते.

आमदार झाल्यानंतर पुढील वर्षी दांडियाला माधुरी दीक्षितला आणूया :

ॲड.वैद्य यांना तब्बल 19 वर्षाचा विधिमंडळ आणि मंत्रालयातील कामाचा तगडा अनुभव आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे ध्येय आहे. आपले सहकार्य असेच राहू द्या. कोणतीही अडचण असू द्या, या भावाला सर्व लाडक्या बहिणींनी हाक द्यावी. तत्पर मदतीसाठी हा भाऊ तयार आहे. या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी पाठबळ द्यावे.

मी आमदार झाल्यानंतर पुढील वर्षी नवरात्र महोत्सवात दांडियासाठी सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना आणूया, असे आश्वासन ॲड. सोमनाथ वैद्य यांनी यावेळी दिले.

Tags: DandiyaElectionMadhuri DikshitSomnath vaidyaSouth solapur
Previous Post

पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. चिंचोलकर तर उद्घाटक देशमुख

Next Post

Sangola: लोकमंगलने घडवला उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
Sangola: लोकमंगलने घडवला उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद

Sangola: लोकमंगलने घडवला उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.