Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur : ‘ या’ रस्त्यासाठी तब्बल 224 कोटी मंजूर ; ‘बापूं’नी करून दाखवलं..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur : ‘ या’ रस्त्यासाठी तब्बल 224 कोटी मंजूर ; ‘बापूं’नी करून दाखवलं..!
0
SHARES
84
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

होटगी रोड: सोलापूर ते इंगळगी रस्त्यास 224 कोटी मंजूर.

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर दक्षिण तालुका मतदारसंघातील होटगी रोडवरील प्रमुख रस्त्यापैकी एक असलेला होटगी रोड ते इंगळगीपर्यंत 34 कि.मी. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामास राज्य सरकारकडून हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल प्रोग्राम (हॅम) अंतर्गत 224 कोटी रूपये राज्य सरकारकडून मंजूर झाले आहेत.

यामध्ये होटगी रोड (महिला हॉस्पिटल) ते होटगी स्टेशन पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण होणार आहे आणि त्यापुढील रस्ता दुपदरी सह संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे. या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी सतत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्याला यश आले आहे.

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर शहरातील आसरा चौक भागाबरोबरच होटगी – होटगी स्टेशन -औज (आ.) – इंगळगी आदी महत्वाची व वर्दळीची गावे आहेत.

या रस्त्याचे काम झाल्यास होटगी आणि परिसरातील गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुका ते कर्नाटक राज्य या मार्गावरील वाहतुकीचा प्रवास वेळ आणि अंतर कमी होणार आहे.

तसेच या रस्त्याच्या परिसरातील एन.टी.पी.सी., साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी तसेच दक्षिण सोलापूर येथील चार ते पाच सिमेंट कारखान्यांना सिमेंटचा कच्चा माल कर्नाटकमधून, आंध्र येथून आणण्यासाठी हा रस्ता अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले असून यासाठी 224 कोटींची मंजुरी मिळाली आहे.

याचे लवकर काम सुरू होणार आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यासह जुने आणि जीर्ण झालेले रस्त्यांची पुनर्बांधणी करणे, आवश्यक ठिकाणी लहान पूल बांधणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

परिसरातील विकासाला चालना मिळेलः आ. देशमुख

रस्त्याचा विकास झाल्यास भोवतालच्या परिसरातील पर्यटन व शेती मालाची वाहतूक वाढीसह या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे खासकरून होटगी आणि परिसराचा विकास साधणे शक्य होईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvisLokmangalnitin gadkariroadsolapurSubhash Deshmukh
Previous Post

Sangola: लोकमंगलने घडवला उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद

Next Post

शहर मध्य मधून काँग्रेसच्या ‘बाबा’ने ठोकला शड्डू ; मोची समाज लढणार आणि जिंकणारच..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
शहर मध्य मधून काँग्रेसच्या ‘बाबा’ने ठोकला शड्डू ; मोची समाज लढणार आणि जिंकणारच..

शहर मध्य मधून काँग्रेसच्या 'बाबा'ने ठोकला शड्डू ; मोची समाज लढणार आणि जिंकणारच..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.