MH 13 News Network
दक्षिण सोलापूर मतदार संघावर यंदा वंचित बहुजन आघाडीचा विजयाचा झेंडा फडकावणारच- संतोष पवार
मार्ग फाऊंडेशनच्या मुख्य संपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कार्यकारिणी, तसेच मार्ग फाऊंडेशनच्या सर्व शाखा अध्यक्ष,पदाधिकारी आणि सदस्यांनची महत्त्वपूर्ण बैठक २५१,दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यामध्ये यंदा दक्षिणेत वंचितचाच झेंडा फडकवणारच असा निर्धार आणि आत्मविश्वास वंचितचे नेते आणि अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याचे काटेकोर नियोजन, बूथ कमिटीची स्थापना, जबाबदाऱ्यांचे प्रभावी वाटप, आणि पक्षाचा जाहीरनामा तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, आणि तांडा येथील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात झाली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व समाजबांधवांच्या एकतेची ताकद बरोबर घेऊन समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून दक्षिण सोलापूरच्या विकासाला एक नवीन दिशा दाखवण्यासाठी आणि यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा विजयी झेंडा दक्षिण सोलापूरच्या भूमीत फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष पल्लवी सुरवसे , विनोद इंगळे , आमसिध्द वाघमारे , सुरेश देशमुख , माजी सरपंच उमेश वाघमारे , चंद्रशेखर गायगवळी , सचिन फडतरे , विक्रांत गायकवाड , निलेश गायकवाड , अविनाश आठवले , राज कदम , प्रकाश पवार , आशालता वाघमारे , हेमा वाघमारे , मंदाताई शिंगे , शहर सचिव सविता कांबळे , शहर सचिव आशालता आवाड , जिल्हा उपाध्यक्ष पुष्पा गायकवाड , शहर संघटक मंदा आठवले , विशाल जेथीथोर ‘ संतोष राठोड , आशिफ यत्नाळ , सुनिल जाधव ,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#दक्षिणसोलापूर #election2024 #विजय #परिवर्तन #बदल #निर्धार #वंचितबहुजनआघाडी #VanchitBahujanAghadi