MH 13 News Network
सोलापूर शहरातून दोन शाळकरी मुली बेपत्ता झाल्याची माहिती 23 जुलै रोजी वाऱ्यासारखी पसरली. त्या दोन्ही सोलापूरच्या लेकी सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी आज बुधवारी रात्री नऊ वाजता विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिली.
थोडक्यात माहिती अशी की..
वरिल बेपत्ता मुलीचे शोध होणेबाबत
दिनांक 23/07/2024 रोजी सकाळी घरातुन सेंट जोसेफ हायस्कूल – सोलापुर येथे शाळेत गेले. शाळा दुपारी 03:15 वाजता सुटल्यानंतर त्या घरी न येता कोणालाही कांहीही न सांगता कोठेतरी निघुन गेलेले आहेत. त्या दोघींचा सर्व ठिकाणी शोध घेऊन न मिळाल्याने सदर पोलीस ठाणे सोलापुर येथे तक्रार नोंद करण्यात आलेली आहे._
मुलीचे वर्णन
कु.आकाशी बिळेनसिध्द खजिनदार वय 15 वर्षे इयत्ता 9वीत शिकत आहे. अंगावर शाळेचे युनिफॉर्म आणि कु.वेदश्री विनायकराव भास्करे वय 14 वर्षे इयता 8 वीत शिकत आहे. अंगावर शाळेचे युनिफॉर्म
वरिल दोन्ही मुली कोठे दिसुन आल्यास अगर मिळुन आल्यास सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर अथवा दोन मोबाईल नंबर दिले होते त्यावर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली होती.
त्यानंतर अनेक व्हाट्सअप ग्रुप वर ही माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आली.
आज शहरातील प्रतिष्ठित नागरिक महेश भंडारी यांच्याकडून त्या दोन्ही मुली सुखरूप असल्याची माहिती आणि रेल्वे स्टेशन वरील व्हिडिओ प्राप्त झाला. यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता भंडारी यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. व्यवसाय किंवा नोकरी करताना मुलांकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे, परंतु कुटुंबासाठी वेळ द्यावा जेणेकरून पालकांमधील आणि मुलांमधील स्नेह संबंध राहील. त्याच सोबत लहान मुलांनी सुद्धा कोणतेही पाऊल उचलताना आपल्या कुटुंबांचा आणि आई-वडिलांचा विचार केलाच पाहिजे असे मत व्यक्त केले.
एका मुलीचे पिता खजिनदार यांच्याशी mh13 न्यूज ने संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही मुली सुखरूप असून आम्ही सोलापूरला निघालो आहे काही काळजीचे कारण नाही असे सांगितले.
I have not checked in here for some time since I thought it was getting boring, but the last several posts are good quality so I guess I’ll add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂