MH 13 News Network
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो लोक एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढून सभा घेणार आहेत. या दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा ,कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली आहे.
मनोज जरांगे पाटील हे सरस्वती चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच सात ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅली संबंधाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जाण्यास येण्यास बंद करण्यात आलेला आहे.
शांतता रॅलीस जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणारा असून यामुळे लोकांची होणारी गर्दी शहरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा आश्रम शाळा, महाविद्यालय व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या शैक्षणिक संस्थातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
त्यासोबत या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत आपले कामकाज करावे, असे आदेशात नमूद केले आहे.
Hi there! I just wanted to ask if you ever have any trouble with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no back up. Do you have any solutions to prevent hackers?
You could definitely see your expertise within the work you write. The arena hopes for more passionate writers such as you who aren’t afraid to say how they believe. Always go after your heart.