Saturday, June 28, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Mohol | मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, जात प्रमाणपत्र वाटप ; ‘या’ साठी शासकीय यंत्रणा सज्ज..

MH13 News by MH13 News
1 March 2024
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
186
VIEWS
ShareShareShare

संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो
   -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सोलापूर, दि. 1-राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणा पत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो. तरी भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना मतदार कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडता येईल, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.


         वडवळ ता. मोहोळ येथे आयोजित मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, जात प्रमाणपत्र वाटप मेळाव्यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी मोहोळ अजिंक्य घोडगे, मोहोळ तहसिलदार सचिन मुळीक, शेतकरी, ग्रामस्थ, युवा मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
       मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की, एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ज्या नागरिकांना मतदार कार्ड नाही त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून द्यावे त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करावी. जे अन्य इतर दाखले भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकाकडे उपलब्ध होत नसतील तर त्यांना स्वयंघोषणा पत्राच्या आधारे मतदार कार्ड उपलब्ध करून अशा वंचित घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
    यानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाने  247 (अ.जा) मोहोळ विधानसभा मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र देण्यात आले आहेत, हे खूप कौतुकास्पद काम झाले असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगून मतदार कार्ड उपलब्ध झालेल्या प्रत्येक नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
   

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त जाती जमाती मधील नवीन 131 मतदारांना ओळखपत्र,  61 जणांना रेशनिंगकार्ड व 612 जणांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.


      प्रारंभी श्री. देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विविध दाखले वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व 131 नवीन मतदारांना मतदार कार्ड उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. या सर्व मतदारांना मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता येणार असल्याचेही सांगितले.
     वडवळ येथील शालेय विद्यार्थ्यानीनी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने काढलेल्या रांगोळीची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी करून शालेय विद्यार्थिनीनीच्या मतदार प्रबोधनासाठी घेत असलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.

Tags: Collector office solapurelection commission
Previous Post

सोलापुरात मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिल्या या महत्त्वाच्या सूचना.. वाचा

Next Post

मोठी बातमी|मुख्यमंत्र्यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी ; ओबीसीतून..! वाचा

Related Posts

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
आरोग्य

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

28 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
शैक्षणिक

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

26 June 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
आरोग्य

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

25 June 2025
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
सामाजिक

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

25 June 2025
Next Post

मोठी बातमी|मुख्यमंत्र्यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी ; ओबीसीतून..! वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.