MH 13News Network
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दरे तांबगावात शिंदे गोगावलेंच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या गावातील बहुतांश मराठे कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीत जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तांब हे गाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात (पूर्वीचा जावळी तालुका) असून त्या गावात गोगावले व शिंदे या आडनांवाची लोकसंख्या जास्त आहे. तसेच त्या गावातील बहुतांश शिंदेना पूर्वी गोगावले या आडनावाने संबोधले जात होते. म्हणजेच बहुतांश गोगावलेची सध्याची आडनावे शिंदे अशी आहेत. अशी माहिती सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे मुळ गांव दरे तांब असून त्या गावात त्यांची वडीलोपार्जित शेती असून त्याचे गट नंबर 30/12, 39/3, 57/21 व 58/47 असे आहेत. तर पूर्वीच्या जुन्या कागदपत्रांवर त्यांचे वडिलांचे नांव संभू नवलु शिंदे असे नमूद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वंशावळ पुढीलप्रमाणे आहे, एकनाथ वडील संभू आजोबा नवलु पणजोबा भिवा किंवा रामजी शिंदे, अशी आहे. दरे तांब गावात गोगावले-शिंदे यांची जवळपास 60 टक्के कुटुंब असून गोगावले यांचा 23 कुणबी नोंदी, शिंदे यांची 01 कुणबी नोंद असे एकूण मिळून गोगावले-शिंदे यांच्या 24 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
तर लकडे व वाघळे यांची प्रत्येकी 01-01 नोंद सापडली आहे, तर आडनाव नसलेल्या 10 नोंदी सापडल्या आहेत. थोडक्यात, दरे तांब गावात 36 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
शिंदे या वंशावलीतील भाव-भावकी पैकी गोंविंद मनाजी दाजी शिंदे याची दि. 20/05/1922 रोजीची नोंद सापडली आहे. तर गोगावले यांनाच शिंदे असेही संबोधले जाते म्हणून त्या 23 नोंदी याही शिंदेच्याच आहेत. त्यामुळे दरे तांब गावातील कुणबी नोंदीच्या वंशावली जुळल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याच्या भावकीला ओबीसी आरक्षणाचा राजकीय फायदा होवू शकतो. असेही प्रसिद्ध पत्रकात नमूद केलेले आहे.
मुख्यमंत्री आता तरी जागे व्हा अन्यथा..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात कुणबी नोंदी सापडल्या आहेत ,हे सर्व शक्य झाले ते मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी लिमिट बाहेर केलेल्या आंदोलनामुळे… त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता तरी जागे होवूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. नाहीतर, येत्या निवडणुकीत मराठे एकनाथ शिंदेना त्यांची जागा दाखवून देतील. असो…जास्त काही लिहीत नाही. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात
योगेश पवार,
प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय छावा संघटना