Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आरंभ ! मध्य मधून देवेंद्र कोठेंच्या पदयात्रेचा ; माय माऊलींच्या आशीर्वादासाठी भावनिक साद..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
आरंभ ! मध्य मधून देवेंद्र कोठेंच्या पदयात्रेचा ; माय माऊलींच्या आशीर्वादासाठी भावनिक साद..!
0
SHARES
185
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून उद्या सोमवार 4 नोव्हेंबरपासून शहर मध्य मधील महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पदयात्रेचा आरंभ होत आहे. माय माऊलींच्या आशीर्वादासाठी लाडका दादा येतोय अशी भावनिक साद कोठे यांनी घातली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तगडी फाईट होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देवेंद्र कोठे यांना मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

उद्या सोमवार (4 नोव्हेंबर) रोजी प्रभाग क्रमांक 9 मधील दाजी गणपती पासून पदयात्रेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती देवेंद्र कोठे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

असा आहे पदयात्रेचा मार्ग..!

उद्या सकाळी दहा वाजता पदयात्रेस सुरुवात होणार असून दाजी गणपती, फलमारी झोन परिसर, मार्कंडेय रुग्णालय, साईबाबा मंदिर मागील परिसर, राम मंदिर परिसर,जमखंडी पूल, जिजामाता दवाखाना, जेलरोड परिसर, श्रीनिवास टॉकीज समोर ,बालाजी मंदिर ,वेंकटेश नगर झोन परिसर, त्रिशक्ती मंडळ ,कुचन नगर परिसर दत्तनगर मेन रोड ,दत्तनगर परिसर गिरी झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टी, विव्हको प्रोसेस असा पदयात्रेचा मार्ग असणार आहे.

महायुतीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.

पहाट गाण्याला पूर्व भागातील स्त्री-पुरुषांचा मोठा प्रतिसाद..

आज भाऊबीजेच्या निमित्ताने पूर्व भागातील नागरिकांसाठी पहाट गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये तेलगू आणि हिंदी भक्ती गीत आणि भावगीतांचा समावेश केला गेला होता. या कार्यक्रमास स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन जनसंवाद साधला.

Tags: Devendra fadanvisDevendra kothe BJPSolapur Maharashtraमध्य मतदार संघशहर मध्यशहर मध्य विधानसभा मतदारसंघ
Previous Post

बेरजेचे राजकारण.! देवेंद्र कोठेंनी मिळवली ‘नेत्या’ची पूर्ण ताकद..

Next Post

सेना भी तैय्यार ,सेनापती भी तैय्यार ! महेश कोठेंच्या पदयात्रेची जय्यत तयारी

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
सेना भी तैय्यार ,सेनापती भी तैय्यार ! महेश कोठेंच्या पदयात्रेची जय्यत तयारी

सेना भी तैय्यार ,सेनापती भी तैय्यार ! महेश कोठेंच्या पदयात्रेची जय्यत तयारी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.