MH 13 News Network
दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांचा गुप्त बैठकीवर जोर वाढला असून भाजप व काँग्रेसमधील नाराज गट कोगनुरे यांच्या संपर्कात येत आहे.मनसैनिकात मात्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा आजचा सोमवारचा दिवस मोर्चेबांधणीत गेला असल्याचे समजते.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजपच्या नाराज गटाबरोबर गुप्त बैठका सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप व काँग्रेसचे नाराज गटांना एकत्रित करुन महादेव कोगनुरे राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करत असल्याची चर्चा सुरू आहे.
हे नाराज गट जर एकत्रित येऊन महादेव कोगनुरे यांना बळ दिल्यास नक्कीच दक्षिण चे चित्र पालटणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वसामान्य माणूस हा महादेव कोगनुरे यांच्या केंद्रस्थानी असल्याने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच महादेव कोगनुरे हे झटत असतात.
यामुळेच मतदारसंघात महादेव कोगनुरे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे.त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजपचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात आल्यास दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र नवचैतन्य पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.