Friday, June 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य पदयात्रा!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य पदयात्रा!
0
SHARES
133
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

जुळे सोलापूरकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत


सोलापूर- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी रविवारी जुळे सोलापुरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर सुवासिनींनी औक्षण करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पदेखील यावेळी करण्यात आला.


दुपारी साडेतीन वाजता जुना विजापूर नाका येथून ढोल-ताशाच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून निवडून येणार कोण, काडादी साहेबांशिवाय दुसरे कोण, हवा कुणाची, काडादी साहेबांची, काडादीसाहेब तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या. धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते.


पदयात्रा मार्गस्थ होताना धर्मराज काडादी यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करुन मतदारांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला.
या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सिकंदरताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील-कुडल, विद्यासागर मुलगे, बाळासाहेब पाटील, शरणराज काडादी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous Post

मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

Next Post

संतोष पवारांच्या जनसन्मान सभेत लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
संतोष पवारांच्या जनसन्मान सभेत लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद

संतोष पवारांच्या जनसन्मान सभेत लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.