Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना सुरू करणार

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना सुरू करणार
0
SHARES
120
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांचे आश्वासन

शहर मध्य मधील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सभेला प्रचंड प्रतिसाद

सोलापूर : महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देण्यात येणार आहेत. महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा जाहीरनामा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांनी येथे केले.


विधानसभा निवडणुकीतील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ इंदिरा नगर येथे सभा झाली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला महिलांची मोठी गर्दी दिसून आली.


यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या कारभारावर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचा विकास हाच महाविकास आघाडीचा ध्यास असल्याचे सांगत खा. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे मिळणार आहे. महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येईल. बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांची मदत करण्यात येईल. जातीनिहाय जनगणना करणार आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही आश्वासन यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी केले.


उज्वल भविष्यासाठी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या काँग्रेसला साथ द्यावी. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
यावेळी महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous Post

संतोष पवारांच्या जनसन्मान सभेत लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद

Next Post

अक्कलकोट : ‘वंचित’चे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा गावभेट,पदयात्रा, रॅलीवर जोर ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
अक्कलकोट : ‘वंचित’चे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा गावभेट,पदयात्रा, रॅलीवर जोर ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अक्कलकोट : 'वंचित'चे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा गावभेट,पदयात्रा, रॅलीवर जोर ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.