Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तालुक्याच्या प्रगतीसाठी परिवर्तनाची गरज ; संतोष पवारांचा नागरिकांशी जनसंवाद

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
तालुक्याच्या प्रगतीसाठी परिवर्तनाची गरज ; संतोष पवारांचा नागरिकांशी जनसंवाद
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK


सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या गावभेट आणि प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चिंचपूर, टाकळी, औराद, नालंदा नगर, कुरघोट, औज, कारकल, लवंगी, भंडारकवठे, मंद्रूप या ग्रामीण भागांसह हत्तुरे वस्ती आणि नई जिंदगी या शहरी भागांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधत परिवर्तनाचा नवा हुंकार भरला.

निधीची गप्पा आणि समस्यांचे दुर्लक्ष”..!

पवार यांनी आपल्या प्रचार सभेत प्रस्थापित नेत्यांवर टीका करताना म्हटले, “सध्याचे आमदार आणि नगरसेवक फक्त निधी आणल्याच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारींना पूर्णतः दुय्यम मानले जाते. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.”

“मूलभूत सुविधांचा अभाव आणि दयनीय स्थिती”..!
पवार यांनी तालुक्यातील दयनीय परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “गावागावांमध्ये ड्रेनेज लाईनचा अभाव, पाच दिवसांनी गढूळ पाणीपुरवठा, अपूर्ण दिवाबत्तीची व्यवस्था आणि खड्डेमय रस्ते ही गंभीर समस्या आजही कायम आहे. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या भागात वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना आवश्यक सेवांचा पुरवठा न करता महानगरपालिका जप्तीच्या नोटिसा पाठवून टॅक्स वसूल करते, ही दुर्दैवी बाब आहे.”

“परिवर्तनाशिवाय विकास अशक्य”..!

“या समस्यांना केवळ निवडणुकांमध्ये भांडवल बनवणारे राजकारणी किती काळ सत्तेत राहणार? आता जनतेने या नेत्यांना उखडून टाकले पाहिजे. तालुक्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्यासाठी परिवर्तन अत्यावश्यक आहे. जनतेच्या विश्वासाने आणि आशीर्वादाने मी या निवडणुकीत दृढ संकल्पाने उभा आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याने मी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देतो,” असे संतोष पवार यांनी सांगितले.

“प्रगतीसाठी नव्या नेतृत्वाला संधी द्या”..!

संतोष पवार यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की, “तालुक्याच्या समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी मला संधी द्या. परिवर्तन घडवण्यासाठी तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे.”

या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे तसेच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रचारसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संतोष पवार यांना तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Previous Post

यवतमाळात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी

Next Post

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास ; मनसे उमेदवार महादेव कोगनुरे

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास ; मनसे उमेदवार महादेव कोगनुरे

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास ; मनसे उमेदवार महादेव कोगनुरे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.