Saturday, February 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी ; मतदार राजाची आता जबाबदारी

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
यंत्रणेची झाली पूर्ण तयारी ; मतदार राजाची आता जबाबदारी
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सी-व्हिजील , 1950 टोल फ्री क्रमांकावरील अर्थिक व वस्तू वाटपांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या

भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव लातूर व नांदेड जिल्ह्यातील निवडणूक खर्चाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया होत आहे. या अनुषंगाने पुढील दोन दिवस सर्व निवडणूक यंत्रणांनी उमेदवाराच्या खर्चाच्या अनुषंगाने तसेच अवैध दारू, रोख रक्कम व अन्य अनुषंगिक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिले.


भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी सोलापूर, धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील निवडणूक खर्च अनुषंगिक यंत्रणांचा आढावा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यलय येथे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खर्च निरिक्षक मीना तेजराम श्रीमनलाल(IRS) , खर्च निरिक्षक श्रीमती बी. ज्योती किरण (IRS), पोलीस आयुक्त एम. राजकुमार , उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, खर्च नोडल यांच्यासह आयकर विभाग, सेवा कर, राज्य उत्पादन शुल्क यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. बालकृष्णन पुढे म्हणाले की, राज्यात निवडणूक काळात शेवटच्या काही तासांमधील प्रचारात गैर मार्गाने मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपाची तक्रार सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावर मिळाल्यास त्यावर अत्यंत गतिमान पद्धतीने कार्यवाही करावी. तसेच या दोन्ही तक्रारीसाठी असणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांनी सजग राहून मतदान प्रक्रिया पारदर्शक व न्याय वातावरणात पार पाडवी . सोशल मीडियावर जर कोणी अशा चुकिच्या प्रक्रियेचे व्हिडिओ पोस्ट केले तरी तो संदर्भ घेवून त्या ठिकाणी भरारी पथक पाठवा. पेड न्यूजबाबतही या काळात चांगल्या प्रकारे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मतदानपूर्व 48 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी याकाळात वस्तू खरेदी, ऑनलाईन ट्रांजेक्शन, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिल्या. सोलापूर जिल्हयाला आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकोबाबत सीमेवरील यंत्रणेने लक्ष ठेवून ती सोलापूर शहरात दाखल होणारच नाही याची काळजी घ्यावी. सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरिक्षक बी.आर. बालकृष्णन यांनी दिले.
तसेच पकडण्यात येणाऱ्या सर्व अवैध मद्य कोठून आले व कुठे जाणार राज्य व केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागांनी जास्त प्रमाणात वाटप साहित्यांची खरेदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर जमा होतो. तसेच विविध ठिकाणी अशा वस्तूंचे गोडावून असतात त्याठिकाणांवर छापे टाकून संशयित बाबींची तपासणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक संशयित ऑनलाईन ट्रांझेक्शन तपासा निवडणूक काळात मोठ्या रकमांबरोबरच लहान लहान संख्येने जास्त ट्रांझेक्शन होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत तपासणी करा. कोणत्याही प्रकारे मतदारांवर परिणाम करणाऱ्या अर्थिक व्यवहार होणारच नाहीत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करण्याचे निर्देश श्री बी. आर. बालकृष्णन यांनी दिले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, वाहतूक विभाग, वन विभाग व वस्तू कर विभाग यांनी निवडणूक काळात खर्चाच्या अनुषंगाने करत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन पुढील दोन दिवस अत्यंत सतर्क राहून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक काळात खर्चाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची अत्यंत सविस्तर माहिती दिली. पोलीस शहर आयुक्त राजकुमार यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत निवडणूक काळात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देऊन त्यामध्ये 21 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांगून आदर्श आचारसंहिता भंगाच्या 14 तक्रारी अनुषंगाने गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत एक कोटी 28 लाखाची अवैध दारू साठा जप्त केल्याचे सांगून निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे – 8462

2.

मुंबई उपनगर – 7579

3.

ठाणे – 6955

4.

नाशिक – 4922

5.

नागपूर – 4631

6.

अहमदनगर – 3765

7.

सोलापूर – 3738

8.

जळगाव – 3683

9.

कोल्हापूर – 3452

10.

औरंगाबाद – 3273

11.

सातारा – 3165

12.

नांदेड – 3088

13.

रायगड – 2820

14.

अमरावती – 2708

15.

यवतमाळ – 2578

16.

मुंबई शहर – 2538

17.

सांगली – 2482

18.

बीड – 2416

19.

बुलढाणा – 2288

20.

पालघर – 2278

21.

लातूर – 2143

22.

चंद्रपूर – 2077

23.

अकोला – 1741

24.

रत्नागिरी – 1747

25.

जालना – 1755

26.

धुळे – 1753

27.

परभणी – 1623

28.

उस्मानाबाद – 1523

29.

नंदूरबार – 1434

30.

वर्धा – 1342

31.

गोंदिया – 1285

32.

भंडारा – 1167

33.

वाशिम – 1100

34.

हिंगोली – 1023

35.

गडचिरोली – 972

36.

सिंधुदुर्ग – 921

Previous Post

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Next Post

मतदानासाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्यांची तरतूद..

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
मतदानासाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्यांची तरतूद..

मतदानासाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्यांची तरतूद..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.