MH 13 NEWS NETWORK
तब्बल ९ हजार घरांपर्यंत संपर्क करत पोहोचविली सरकारच्या कामांची माहिती
सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीमने शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अनोखी प्रचार यंत्रणा राबवत पक्षाच्या निवडणूक प्रचार अभियानात सहभाग घेतला. शहरातील सुमारे ९ हजार घरांपर्यंत पोहोचत नागरिकांना महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती देत भाजपाचे नेते मोहन डांगरे आणि त्यांच्या ५० जणांच्या टीमने यांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
विशेषतः शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मल्लिकार्जुन नगर, अंबिका नगर, संगमेश्वर नगर, रमण नगर, यशराज नगर, पडगाजी नगर, भंडारे वस्ती, समाधान नगर, किसान संकुल, किसान नगर, मार्कंडेय नगर, प्रियदर्शनी सोसायटी, यशवंत सोसायटी, वेणुगोपाल नगर, हुडको कॉलनी, गुरुनाथ नगर, हनुमान सोसायटी, न्यू आनंद नगर, सुनील नगर, भारत सोसायटी, रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर, रोटे कॉम्प्लेक्स परिसर, लष्कर, लोधी गल्ली, डॉ. वैशंपायन हाऊसिंग सोसायटी, गुरु छाया अपार्टमेंट परिसर, सप्तगिरी हाउसिंग सोसायटी गुरुकृपा अपार्टमेंट परिसर, मोहिते नगर आदी भागांमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांना पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच महायुती सरकारच्या कामांची माहिती देत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचबरोबर रामवाडी सेटलमेंट परिसरातून सुमारे ३० हजार नागरिकांच्या उपस्थितीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढून सभा घेण्यात आली. माणुसकी प्रतिष्ठान, सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भटक्याविमुक्त जाती-जमातींतर्फे सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यात आला. तसेच शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी महिलांना संघटित करून भाजपा आणि महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा येण्यासाठी या महिलांचे प्रबोधन करण्यात आले.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून भाजपाचे नेते मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, वसंत जाधव, राहुल डांगरे यांनी मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधत निवडणूक प्रचार यंत्रणेत सहभाग घेतला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीमने पक्षाच्या प्रचार यंत्रणेला पूरक काम करत निवडणूक प्रचार अभियानाचा विस्तार होण्याकरिता सहभाग घेतला.