MH 13 news network
राष्ट्रीय रायफलमध्ये त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक
सोलापूर : केरळ येथे थिरूवनंतपुरम (त्रिवेंद्रम) मध्ये झालेल्या जी.व्ही. मालवणकर अखिल भारतीय राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेतील ज्युनिअर वुमन्समध्ये सुकन्या त्वरिता सूर्यकांत खटके हिने सुवर्णपदक पटकावीत वन प्लस वन सिल्व्हर आणि गोल्डपदक मिळविले.त्वरिता ही केरळ येथे २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय रायफल्स चॅम्पियनशिपसाठी एनसीसी नॅशनल कॅम्पसाठी गेली होती.
दरम्यान, सोलापूरच्या त्वरिता हिने पहिल्यांदाच एनसीसी डायरेक्टमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व तमिळनाडू येथे केले. केरळ येथे थिरूवनंतपुरम (त्रिवेंद्रम) मध्ये झालेल्या जी. व्ही. मालवणकर स्पर्धेत त्वरिता हिने सहभाग घेतला होता.ज्युनिअर ऑल इंडिया गोल्ड व सिल्व्हरवर आपले नाव कोरून त्वरिताने एक इतिहास रचला आहे. त्वरिता हिने यापूर्वीही अनेक स्पर्धात यश मिळवून सोलापूरचे नाव उंचाविले होते. जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरावर तिने अनेक पदके मिळविली आहेत.
त्वरिताच्या यशाबद्दल प्रशिक्षक अंजली भागवत, सहायक प्रशिक्षक रश्मी, आई नीलम, वडील सूर्यकांत खटके,जुळे सोलापूर मधील फ्लोरा कासा सोसायटीचे चेअरमन सचिन जाधव, माजी चेअरमन आदिनाथ चव्हाण, यांनी कौतुक केले आहे.