Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली जे.पी. नड्डा यांची भेट..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली जे.पी. नड्डा यांची भेट..!
0
SHARES
125
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभा करा, राज्य सरकार मदत करेल; खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोलापूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून मागणी केली आहे.

प्रणिती शिंदे या खासदार झाल्यापासून सोलापूरच्या विविध विकास प्रकल्पांवर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहेत. ज्यात विमानतळ विकास, रेल्वे सुविधांचा विस्तार, युवकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचा विज, पाणी, हमीभाव या सारख्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचप्रमाणे आता त्यांनी सोलापूरसाठी एम्सची मागणी केली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोलापूरची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या पाहता सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूरमध्ये एम्स सारख्या अद्ययावत रुग्णालयाची आवश्यकता आहे. सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. सोलापूर शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. शिवाय ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत.

त्यामुळे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये एम्सची स्थापना होणे एक गरजेची बाब असून त्याचा लाखो रुग्णांना फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्ससारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे शिंदे यांनी संसदेत सोलापूरसाठी ही मागणी उपस्थित केली आहे.

सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.तसेच महाराष्ट्र सरकारने सोलापूरमध्ये एम्स उभे राहण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे सोलापूर हे एम्स प्रकल्पासाठी योग्य ठिकाण ठरेल, असेही शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.दरम्यान, मागील दहा वर्षांत सोलापूरचे विकास कामे बऱ्याच प्रमाणात रखडले होती. भाजपच्या खासदारांकडून सोलापूरच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत, असा आरोप होत आहे.

मात्र, प्रणिती शिंदे यांनी खासदार पद मिळाल्यापासून सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. त्याप्रमाणेच एम्स रुग्णालयाच्या खासदार शिंदे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे.

Tags: Bjp indiaJp naddapraniti shinde CongresssolapurSolapur Maharashtra
Previous Post

जैन गुरुकुलात दहावी व्याख्यानमालेचे उद्घाटन

Next Post

लोकमंगल विवाह सोहळा रविवारी : आ. सुभाष देशमुख

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
लोकमंगल विवाह सोहळा रविवारी : आ. सुभाष देशमुख

लोकमंगल विवाह सोहळा रविवारी : आ. सुभाष देशमुख

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.