MH 13 News Network
प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन भारतातील सर्वांत प्रसिद्ध तबलावादक अशी ख्याती असलेल्या अल्ला रखाँ खान यांचे सुपुत्र असलेले झाकीर हुसेन एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. वयाच्या 73 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते.
वयाच्या 73 वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते.मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांचा पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं होतं.वयाच्या अवघ्या 11 वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता .
1988 साली पद्मश्री 2002 मध्ये पद्मभूषण चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ते संगीतकार होते.झाकीर हुसेन यांच्या निधनाबाबत अनेक दिग्गजनी शोक व्यक्त केला आहे.
भारतीय संगीतातील तबला या वाद्याला जगाच्या व्यासपीठावर त्यांनी विराजमान केले. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण सन्मानाने गौरविले तर जगाने ग्रॅमी पुरस्कार आणि एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह पुरस्कार देऊन त्यांच्या प्रतिभाशाली कर्तुत्वाची नोंद घेतली. कलाविश्वातील एक अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला.