Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“त्याला” मोदी स्मशानभूमी जवळ हटकले..! सापडला चोरीचा लाखोंचा मुद्देमाल..! ओळखीच्या घरातच…!

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
“त्याला” मोदी स्मशानभूमी जवळ हटकले..! सापडला चोरीचा लाखोंचा मुद्देमाल..! ओळखीच्या घरातच…!
0
SHARES
445
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

ओळखीच्या ठिकाणी, चोरी करणाऱ्या एकास सोलापूर शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ८५.७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १८४.५ ग्रॅम चांदीचे दागिने असा रु. ४,९२,५२०/- (चार लाख व्यान्नव हजारपाचशे वीस /-) किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या टीमने आपल्या स्टाईलने तपास करून मोदी येथील स्मशानभूमीजवळून ताब्यात घेतले.

वाचा, काय आहे हकीकत..!

श्रीकांत बाबू गोलेकर, वय-३० वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. ब्लॉक नं. १४. सोनी नगर, मोदी हुडको, सोलापूर

यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर यांचे घरी दि.२२/०१/२०२४ रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने, श्रीकांत इतर नातेवाईक, अनिल गोलेकर यांच्या मोदी हुडको, सोलापूर या घरी ये जा करीत होते. सदर कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांचे घरातून अनिल यांचे घरात ये-जा करीत होते. त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्याचे धरास कुलूप न लावता, घर उघडेच ठेवले होते.

सदर कार्यक्रमा दरम्यान दि. २२ जानेवारी 2025 रोजी अज्ञात चोरटयाने, श्रीकांत यांचे घरात प्रवेश करुन, बेडखाली ठेवलेली पत्र्याची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते.

सदर घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ८०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, श्री. सुनिल दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली होती.

सदर गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पध्दतीवरुन, सपोनि शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांचे जवळच्याच कोणीतरी माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठिण झाले होते. परंतु गुन्हे उघडकीस आणण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविली. महत्वपूर्ण तांत्रिक घटकांचे विश्लेषण करून गुन्हा करणारा हा फिर्यादी श्रीकांत गोलेकर यांच्या जवळचा नातलग, मजुरी करणारा अनिल गोलेकर वय-३३ वर्ष, रा. ब्लॉक नं. १२९, सोनी नगर, मोदी हुडको सोलापूर हा असल्याची खात्री केली.

त्यानंतर त्यास सपोनी शैलेश खेडकर व पथकाने सापळा लावून, तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना, मुददेमालासह दि. सात फेब्रुवारी रोजी मोदी स्मशानभुमी जवळून ताब्यात घेतले.

त्याचे अंगझडतीत, त्याने फिर्यादी यांचे घरातून चोरलेले ८५.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व १८४.५ वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण ४.९२.५२०/-रु. किंमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा अत्यंत काळजीपुर्वक, कौशल्याने उघडकीस आणला.

सदरची कामगिरी श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

डॉ.स्मिता पाटील यांच्या ‘मातीला पंख फुटताना’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

Next Post

TB विरोधी लढ्यात सोलापूर रेल्वे विभाग सज्ज.! कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर..!

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
TB विरोधी लढ्यात सोलापूर रेल्वे विभाग सज्ज.! कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर..!

TB विरोधी लढ्यात सोलापूर रेल्वे विभाग सज्ज.! कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.