Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डॉ.स्मिता पाटील यांच्या ‘मातीला पंख फुटताना’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
0
डॉ.स्मिता पाटील यांच्या ‘मातीला पंख फुटताना’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न
0
SHARES
55
VIEWS
ShareShareShare

“मातीला पंख फुटताना” ही कुमार कादंबरी अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्य यांच्या काळोखाला भेदून प्रकाशमान वाटेवर येणाऱ्या शाळकरी मुलीच्या जिद्दीची कहाणी सांगते. ही कहाणी समाजातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, हेच या पुस्तकाचे खरे यश आहे. असे विचार साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले. मोहोळच्या लेखिका डॉ. स्मिता पाटील लिखित “मातीला पंख फुटताना”, या कादंबरीचे आणि “नाही गिरवता येत कुठलीच लिपी” यादुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे होते. याप्रसंगी कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, डॉ. प्रमोद पाटील यांची या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती होती. आपल्या पुस्तकातून ग्रामीण भागातील स्त्रियांचे विदारक चित्र मांडले आहे. तरुण मुलांच्या भावविश्वाची चपखल मांडणी केली आहे, असे श्रीकांत पाटील म्हणाले.

श्रीकांत मोरे यांनी लेखिका स्मिता पाटील यांचे कौतुक करत माणूस नुसताच भौतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. परंतु सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या कोताच राहिल्याची खंत व्यक्त करत ही कविता केवळ स्त्रीच्याच नव्हे तर माणूसपणाला नकार देणाऱ्या सर्वच व्यथांना आपल्या विश्वात सामावून घेत एक नवा सम तावादी समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहते. असे सांगितले.

प्रास्तविक डॉ. स्मिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी केले तर आभार डॉ. प्रमोट पाटील यांनी मानले. यावेळी उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, डॉ. नसीम पठाण, जे. जे. कुलकर्णी कवी मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे, राजेंद्र भोसले, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. श्रुती वडगबाळकर, वंदना कुलकर्णी, दिगंबर भगरे, डॉ. सुहास पुजारी उपस्थित होते

Tags: Dr.pramod patilDr.Smita patilKadambarimoholsolapurSolapur Maharashtra
Previous Post

ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या उत्सव अध्यक्षपदी महेश ठाकरे

Next Post

“त्याला” मोदी स्मशानभूमी जवळ हटकले..! सापडला चोरीचा लाखोंचा मुद्देमाल..! ओळखीच्या घरातच…!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
“त्याला” मोदी स्मशानभूमी जवळ हटकले..! सापडला चोरीचा लाखोंचा मुद्देमाल..! ओळखीच्या घरातच…!

"त्याला" मोदी स्मशानभूमी जवळ हटकले..! सापडला चोरीचा लाखोंचा मुद्देमाल..! ओळखीच्या घरातच...!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.