MH 13News Network
यंदाच्या जागतिक महिला दिनी (८ मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली असून ही पाटी कौतुकाचा विषय ठरली आहे.
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस …
आपल्या बाळासाठी आई नेहमीच अनेक गोष्टींचा त्याग अगदी हसत हसत करते. स्वतः बाळाला 9 महिने गर्भात सांभाळून, कळा सोसून त्याला जन्म देते. मात्र जन्मानंतर त्या बाळाच्या नावापुढे नाव लावण्याचा अधिकार फक्त वडिलांना मिळतो.
आज मला आनंद होतोय की, मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची आज सुरुवात झाली असून आता वडिलांच्या नावासोबत आईचे नाव जोडले जाणार आहे. हे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे लागू करण्यात आले. या प्रसंगाचे साक्षीदार होता आले याचा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.