Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

संविधानानुसार देशाचा कारभार , त्याची रचना कोणी बदलू शकत नाही: ॲड. राजपूत

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
संविधानानुसार देशाचा कारभार , त्याची रचना कोणी बदलू शकत नाही: ॲड. राजपूत
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

संविधानानुसार देशाचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही: ॲड. राजपूत

सोलापूर विद्यापीठात संविधान गौरव महोत्सव अंतर्गत व्याख्यान सोलापूर, दि. 21- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधानानुसार देशाचा, राज्याचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही, असे स्पष्ट मत जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने संविधान गौरव महोत्सव अंतर्गत ‘आपले संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जिल्हा सरकरी वकील ॲड. राजपूत हे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

ॲड. राजपूत म्हणाले की, संविधान हा देशाचा कणा आहे. संविधानात केलेल्या तरतुदीनुसारच देशाचा कारभार चालतो. भारतीय नागरिकांना देखील मूलभूत हक्क व अधिकार संविधानानुसार प्राप्त झाले आहेत. प्रत्येक नागरिकांचे देखील कर्तव्य आहे की, आपल्याला मिळालेल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून घेतले पाहिजे. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी तसेच प्रत्येक नागरिकांनी करायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर विविध कायदे व कलमांची माहिती देखील ॲड. राजपूत यांनी यावेळी दिली.

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वात महान संविधानाची निर्मिती केली. संविधान ही कायद्याची जननी असून यामुळे देशातील शिस्त व संस्कृती टिकली आहे. प्रत्येकांसाठी कायदे समान आहेत. प्रत्येकाला समान जगण्याचा अधिकार व हक्क संविधानाने दिलेले आहे. अतिशय सुस्पष्ट आणि महान भारतीय संविधान असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘आपले संविधान’ या विषयावर जिल्हा सरकरी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदी.

Tags: Adv pradeepsing RajputSavidhansolapurSolapur Maharashtrasolapur university
Previous Post

गाणारे दगड, बोलणारे पाषाण’ प्रदर्शन सोलापुरात..! पाहिले का..?

Next Post

महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन ; शिवभक्तांना आवाहन

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन ; शिवभक्तांना आवाहन

महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन ; शिवभक्तांना आवाहन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.