MH13NEWS Network
तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामठे यांना मारहाण प्रकरणात माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता
सोलापूर : तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामठे यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील (वय ६८, रा. सोरेगाव, ता. उत्तर सोलापूर) यांच्यासह इतर ७ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे.
घटनेची पार्श्वभूमी..
(१६ ऑगस्ट २००७)सात रस्ता येथील रविकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री समर्थक फटाके वाजवत होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत फटाके बंद करण्यास सांगितले. यावेळी रविकांत पाटील यांनी “मी आमदार आहे, माझ्या कार्यकर्त्यांना फटाके वाजवू द्या” अशी हरकत घेतली.
त्यानंतर घटनास्थळी पोलीस आयुक्त अशोक कामठे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मण भोसले, पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे आले असता, कार्यकर्त्यांना अटक करताना झालेल्या गोंधळात रविकांत पाटील यांनी धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप पोलिसांनी केला होता.

सदर प्रकरणी रविकांत पाटील, उदय शंकर पाटील, गणेश कटारे, राम खांडेकर, श्रीशैल खंदारे, मल्लिनाथ निरगुडे, सदाशिव मस्के, कल्लप्पा वाघमारे, जब्बार शेख व बाळासाहेब घुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
👩⚖️ न्यायालयीन निर्णय
सरकारतर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी पोलिसांनी बेकायदेशीरपणे मध्यरात्री घरात प्रवेश करून गोंधळ घातल्याचे सांगितले. तसेच लावण्यात आलेली कलमे शाबित न झाल्याचे नमूद केले.ही बाजू ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली.
👨⚖️ वकील मंडळ • आरोपीतर्फे : ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे, ॲड. व्ही.डी. फताटे, ॲड. विक्रांत फताटे • सरकारतर्फे : ॲड. प्रकाश जन्नू
Ritesh Thobde
Vinod SuryawanshiMilind Thobde#सोलापूर#CourtNews#RavikantPatil#LawAndOrder