mh 13 news network
“खोलीकरण, रुंदीकरण हाच पूरनियंत्रणावर उपाय!”*

-पर्यावरणतज्ज्ञ श्री. अनिल नारायणपेठकर
पूरनियंत्रणासाठी आदिला नदीचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज अधोरेखित करताना श्री. नारायणपेठकर यांनी सांगितले की,
नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण हेच दीर्घकालीन व परिणामकारक उपाय आहेत.
यामुळे नदीच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल आणि पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.
पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह, नदीतील गाळाची साठवण, तसेच पाण्याचा जमिनीत मुरण्याचा वेग- या सर्व घटकांचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे.
कृती समितीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत समितीचे अध्यक्ष राजकिरण चव्हाण, डॉ. उत्कर्ष वैद्य, प्रवीण तळे, शिरीष गोळवलकर, दैनिक सकाळचे पत्रकार अरविंद मोटे आणि ओंकार सावंत उपस्थित होते.
समितीच्या माध्यमातून आदिला नदी संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समिती
_“लोकसहभागातून नदीचे आरोग्य, परिसराचा विकास!








