जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्थेतील बदलामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज – ॲड. श्रीरंग लाळे
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला असताना अनेक विचार प्रवाह राज्यामध्ये सुरू असताना शिवजयंती व्याख्यानमालेत मराठा आरक्षणावर आपली अभ्यासू भूमिका ॲड. श्रीरंग लाळे यांनी मांडली. जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्थेतील बदलामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
जागतिकीकरणासोबत शेती मूल्य कमी झाले. अर्थव्यवस्था बदलली त्यामुळे स्पर्धा वाढली या स्पर्धेच्या युगात मराठ्यांना आरक्षणाची गरज वाटू लागली. तसेच शैक्षणिक जागृती झाल्यामुळे परत स्पर्धा वाढली. त्या अनुषंगाने आरक्षणाची गरज वाढू लागली. मराठा समाजाने मनगटाचा वापर न करता डोक्याचा वापर केला पाहिजे असे म्हणाले.
शिवजयंती व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंपताना पुढे ते म्हणाले की, मराठा आरक्षणाची सुरुवात ही घटनेच्या आर्टिकल 15 व 16 मधून झाल्याची आपणास पाहण्यास मिळते. मराठा आरक्षणाला येणाऱ्या अडचणी घटनेतील वेगवेगळ्या कलमाद्वारे कशा येतात त्यांची त्यांनी सखोल चर्चा करावी. मराठा आरक्षण संदर्भात बोलताना ते म्हणाले कुणबी पुरावे 52% सापडल्यामुळे ते आरक्षण मिळण्यासाठी पात्र आहेत.
शेवटी प्रश्न उत्तराच्या सत्रामध्ये त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या संदर्भात सांगून श्रोत्यांच्या प्रश्नाचे निरसन केले.
यावेळी प्रा महेश माने,विनायक पाटील,ज्ञानेश्वर सपाटे, महादेव गवळी,नामदेव थोरात, रेखा सपाटे, माऊली पवार, श्याम गांगुर्डे, हेमंत पिंगळे, डॉ अनिल बारबोले,डॉ मधुकर पवार,सुजाता जुगदार, प्राचार्य राजेंद्र शिंदे, प्रा नागनाथ नवगिरे,दत्ता भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.