Wednesday, August 27, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वाढदिवस अजितदादांचा : ‘इच्छा भगवंताची ‘तर्फे नवजात बालकांच्या नावे ५ हजारांचे डिपॉझिट

MH13 News by MH13 News
1 year ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
61
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network


क्षयरुग्ण बाधितांना इच्छा भगवंताची मित्र परिवाराकडून सहा महिन्याचे मोफत धान्य किट वाटप

सोलापूर:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंतीची मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवार राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित साधून सोलापूर महानगरपालिका रामवाडी युपीसी सेंटर मध्ये २२ जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आले.

तसेच नवजात मातेच्या बालकास लागणाऱ्या साहित्याचे देखील वाटप करण्यात आले. तसेच या परिसरातील क्षयरुग्ण बाधितांना सहा महिन्यांसाठी लागणाऱ्या धान्याचे किट देखील या वेळेस वाटप करण्यात आले.

यावेळी सो.म.पा. महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, डॉक्टर शिल्पा शेटे, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ओबीसी प्रदेश सरचिटणीस बशीर शेख, महेश निकंबे, रियाज शेख अलताफ कुरेशी, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,महिला प्रदेश पदाधिकारी सायरा शेख,राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार,प्रमिला स्वामी, सरोजनी जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी आठवले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक करताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते मार्गदर्शक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय अशा अन्य क्षेत्रात विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून २२ जुलै रोजी मनपा आरोग्य केंद्रामध्ये जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यात आले आहे. या बालकांच्या भविष्यातील शिक्षणासाठी आर्थिक हातभार आमचा देखील असावा या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली आहे. अठरा वर्षानंतर या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी हे पैसे कामी येतील.

सर्वसाधारण कुटुंबामध्ये आर्थिक संकटाची चिंता असते ही गरज ओळखून दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा अभिनव उपक्रम राबविला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. दरम्यान किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम राबविला सर्वसामान्य कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला त्यांचे कार्य कौस्तुकास्पद असल्याचे मनोगत यावेळी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण यांनी व्यक्त केलं.

किसन जाधव हे नेहमीच गोरगरीब कुटुंबांच्या पाठीशी खंबीर उभे राहतात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये अग्रेसर असतात त्यांनी आज राबविलेला उपक्रम हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत मनपा आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांनी व्यक्त केलं.

यावेळी रामवाडी यूपीसी सेंटर मधील मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनिल पवार, सुपरवायझर रुपेश गायकवाड, यास्मिन पठाण, मेट्रन प्रसुती गृह सत्यभागा गायकवाड, रेखा गायकवाड पुनम जाधव यांच्यासह रामवाडी यूपीसी सेंटर मधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरग,ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, साद मुलानी, फिरोज पठाण, अभिषेक अन्वेकर यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवार व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले तर आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले.

Tags: Ajit pawar ncpkisan jadhav ncpsolapur
Previous Post

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा..

Next Post

सोलापूर काँग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
सोलापूर काँग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

सोलापूर काँग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.