MH 13 NEWS NETWORK
अक्कलकोट: महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सुरेखा कल्याणशेट्टी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी आनंद मेळावा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे संचालक मल्लिकार्जुन मसुती यांच्या हस्ते फित कापून आनंद मेळाव्याचा उद्घाटन करण्यात आला. यात इयत्ता 11 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ उदा. कस्टर्ड,दाल-चावल, बटाटे वडे, वडापाव, पाणीपुरी, भेळ, कचोरी, पावभाजी, सँडविच कच्ची दाबेली अशा विविध खाद्यपदार्थांची अतिशय सुंदर अशी मांडणी करून ठेवले होते. तसेच लिंबू शरबत, उसाचा रस, गुळाचा चहा आधी पेय सुद्धा ठेवले होते. या मेळाव्याचा आनंद शिक्षण संकुलातील गिरिजामाता प्राथमिक विद्यालय, सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय तसेच शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय मनमुराद लुटला तसेच आस्वादही घेतला. या मेळाव्यास संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी,संस्थेच्या सीईओ सौ रुपाली शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख सौ पूनम कोकळगी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सलोनी शहा, गुरुशांत हपाळे, प्रा शिल्पा धूमशेट्टी, प्रा शितल टिंगरे, शिवकुमार मठदेवरु, मनीषा शिंदे, शितल फुटाणे, जनाबाई चौधरी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.