अट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी आदित्य बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
अक्कलकोट | सोलापूर
स्कॉर्पिओ गाडीने धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी आदित्य बिराजदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
घटनेची हकीकत
फिर्यादी गाडीतून जात असताना आरोपी ताउसिफ चौधरी यांनी जाताना थुंकले व ती थुंकी फिर्यादींच्या अंगावर पडल्याने वाद निर्माण झाला. शाब्दिक बाचाबाची वाढताच उपस्थित आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली व ग्रामपंचायत सदस्य आदित्य बिराजदार यांना बोलावले. बिराजदार हे बोलेरो जीपमधून येऊन फिर्यादीला जोरदार धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी यापूर्वी फेटाळला होता.
उच्च न्यायालयातील युक्तिवाद

आदित्य बिराजदार यांच्या वतीने अॅड. हृषिकेश शिंदे व अॅड. अविनाश खरटमल यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. अॅड. शिंदे यांनी न्यायालयात मांडले की—
• आरोपीस राजकीय द्वेषातून गुन्ह्यात गोविण्यात आले आहे,
• आरोपी घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित नव्हता,
• या घटनेत अट्रॉसिटी कायद्याचे कलम लागू होत नाही,
• तसेच फिर्यादीच्या गाडीचा पंचनामा करण्यात आलेला नाही.
न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करून आदित्य बिराजदार यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.








