mh 13 news network
कोयना नगर, देवतारा नगर व वानकर नगरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर | प्रतिनिधी
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ‘लाडक्या बहिणी’ यांचा भक्कम पाठिंबा मिळत असून, कोयना नगर, देवतारा नगर आणि वानकर नगर येथे आयोजित बैठकींना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडणुकीपूर्वी ३ हजार रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरत असल्याचे मत भाजप उमेदवार मृण्मयी गवळी व सोनाली गायकवाड यांनी व्यक्त केले.
गुरुवारी प्रभाग क्रमांक ६ मधील कोयना नगर, देवतारा नगर आणि वानकर नगर येथे आयोजित लाडक्या बहिणींच्या बैठकींमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. भाजपाच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी लाडक्या बहिणींनी ठाम भूमिका घेत ‘पदर खोचल्याचे’ चित्र यावेळी पाहायला मिळाले.
लाडकी बहीण योजनेमुळे विवाहित, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना आर्थिक आधार मिळत असून, महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने ही योजना प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्टही साध्य होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी भाजपचे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्यासह उमेदवार सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकींना संध्या वानकर, ज्योत्सना सुपाते, विमल कोरे, माधुरी भोसले, विजया भातलवंडे, पूनम वानकर, रुपाली वानकर, शायदा शेख, प्रमिला लेंडवे, नूरजहाँ शेख, बिस्मिल्ला शेख, फातिमा सय्यद, ज्योतीताई शिनगारे, लताताई भुसारे, कुलकर्णी मॅडम, सुनीता कोरे, विमल रणदिवे यांच्यासह कोयना नगरातील बैठकीस राजश्री दिंडोरे, दीपाली घुले, शांता घुले, अश्विनी घुले आणि सुशीला मोरे उपस्थित होत्या








