\
MH 13 NEWS NETWORK
प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवार गणेश वानकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
होम टू होम प्रचारात नागरिकांचा विश्वास, महिलांकडून आरती करून स्वागत

सोलापूर (प्रतिनिधी):
राजकारणात नेता कोणत्या पक्षात आहे, यापेक्षा त्याने जनतेसाठी केलेली कामे महत्त्वाची ठरतात, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे उमेदवार गणेश वानकर यांना प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपचे उमेदवार गणेश वानकर, सोनाली गायकवाड, मृण्मयी गवळी आणि सुनील खटके यांच्या होम टू होम प्रचाराचा मंगळवारी दुसरा दिवस होता. सकाळच्या सत्रात साठे पाटील वस्ती व थोबडे वस्ती परिसरात प्रचार करताना नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
या वेळी गणेश वानकर यांनी नगरसेवक असताना मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या आठवणी नागरिकांनी जाग्या केल्या. रस्ते, वीज व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांमुळे परिसरातील अनेक अडचणी कायमस्वरूपी सुटल्याचे नागरिकांनी सांगितले. घरोघरी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असतो. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल महिलांनी भाजपचे उमेदवार गणेश वानकर यांची आरती करून कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण प्रचारात विशेष लक्षवेधी ठरला.
महापालिकेत भाजपची सत्ता असताना आणि नगरसेवक शिवसेनेचा असतानाही विकासाचा धडाका लावण्यात आला होता. आता सत्ताधारी भाजपसोबत गणेश वानकर गेल्यामुळे प्रभागाच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. या भागातून भाजपला मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही नागरिकांनी दिली.
थोबडे वस्ती, साठे पाटील वस्तीसह संपूर्ण परिसरात भाजप उमेदवारांनी व्यापक प्रचार केला.
यावेळी अरुण जाधव, आशिष डिगोळे, महेश मुदलियार, नागेश मस्के, सोमाथ मस्के, प्रमोद आवताडे, नवनाथ मस्के, समर्थ डोंगरे, रितेश मस्के, चेतन घुले, योगेश मस्के, महादेव काळे, सागर डोंगरे यांच्यासह परिसरातील नागरिक व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या समस्यांना प्राधान्य – मृण्मयी गवळी
प्रभाग क्रमांक सहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी आपण निवडणूक लढवत आहोत. प्रभागातील महिलांच्या समस्या सोडविणे हे आपले प्रथम प्राधान्य असेल, असे भाजपच्या उमेदवार मृण्मयी गवळी यांनी सांगितले.
विशेषतः शौचालयांचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर सोलापूर महानगरपालिकेत ठामपणे आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक असताना गणेश वानकर यांनी केलेली विकासकामे भाजपच्या उमेदवारांच्या विजयात मोलाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला








