MH 13 News Network
आज सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स, निफ्टी, मोठ्या प्रमाणावर घसरले असून शेअर बाजार कोसळला आहे. शेअर बाजार मध्ये ब्लॅक मंडे आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ कार्ड धोरणामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. निफ्टी जवळपास 1000 अंकांनी तर सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला आहे.कोरोना नंतरची सर्वात मोठी पडझड असून यामुळे जागतिक बाजारात मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेच्या टेरिफ कार्ड धोरणामुळे भारताच्या निर्यात उत्पादनावर 26 टक्के कर आकारणी होणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला. डॉलरचा भाव वाढला असून रुपयाचे अवमूल्यन झाले आहे कच्च्या तेलाच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल साठ रुपये यावर आला आहे.
भारतीय रुपया 85.24 वरून 85.74 प्रति डॉलर असा झाला आहे. सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला असून निफ्टी 1000 अंकांनी कोसळला आहे.शेअर बाजारातील हा ब्लॅक मंडे असून यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले.
आज सोमवारी तैवानचा शेअर बाजार 9.8 टक्क्याने कोसळला आहे. तर जपान आणि हाँगकाँग येथील भांडवली बाजारातही लक्षणीय 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 6.4 टक्क्यानं घसरला आहे. सिंगापूर शेअर बाजारात 5.5% तर मलेशियात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत सोनं आणि कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ कार्डच्या विरोधात कॅनडा, ब्रिटन,फ्रान्स जर्मनी, जपान आहेत. तसेच या ट्रेड वॉर मुळे भारतावर याचा थेट परिणाम होणार आहे.
ट्रेड वॉरमुळे अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती अनेक जण व्यक्त करत असून गुंतवणूकदारांनी तूर्तास मोठी गुंतवणूक करू नये. घाबरून जाऊ नये, कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.