MH 13 News Network
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेला मनोज जरांगे फॅक्टर यंदाच्या विधानसभेमध्ये वेगळ्या पद्धतीने काम करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. आमची माघार नाही तर हा गनिमी कावा आहे. सर्व मराठा उमेदवारांनी अर्ज आजच्या आज मागे घ्यावे, एका जातीवर निवडणूक लढवता येणे शक्य नाही त्यामुळे आपण हा निर्णय घेतलाय , मात्र आंदोलन सुरूच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले.
कुणालाही पाठिंबा देणार नाही ही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केले.
अंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलताना आज 4 नोव्हेंबर रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांनी ज्यांनी जरांगे यांच्या सांगण्यावरून अपक्ष उमेदवारी अर्ज विधानसभा मतदारसंघासाठी भरले आहेत त्यांनी आजच्या आज काढून घ्यावे असे सांगितले.
सर्व मराठा उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे असे सांगितले आहे. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक आपल्याला लढायची नाही ,आंदोलन सुरूच राहणार हे त्यांनी सांगितले केले. मित्र पक्षांची यादी अजून आली नाही त्यामुळे आपण उमेदवार दिला नाही असे त्यांनी सांगितले. ही माघार नाही तर गनिमी कावा आहे. याला पाडा त्याला पाडा ही आपली भूमिका नाही. कुणालाही आणा, कुणालाही पाडा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही अपक्षाला पाठिंबा दिला नाही. कोणालाही कोणत्याही जागेवर पाठिंबा जाहीर केला नाही. असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
आपल्याला निवडणूक लढवायची नाही . आपली फसगत होईल. आपल्या आपल्या अर्ज काढून घ्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.मराठा समाजातील सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सांगितले आहे.आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक प्रक्रियेत राहिलो तरी खेळ खल्लास, निवडणूक प्रक्रियेबाहेर राहिलो तरी खेळ खल्लास असे वक्तव्य करून नेमके कुणाला पाडायचे हे लवकर कळेल असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देर आये दुरुस्त आये अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजी राजे यांनी जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भेट होत नाही तोपर्यंत भूमिका सांगू शकत नाही असे माध्यमांना सांगितले.
तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून पळ काढला अशी टीका केली आहे.