Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Breaking: शरद पवारांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी विचारला जाब..! म्हणाले..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
1.3k
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी सोलापुरात आले असताना एका ठिकाणी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवून मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करून जाब विचारला.


पवार हे पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बार्शीकडे जात असताना वाटेत कुर्डूवाडीजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडवून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलकांशी संवाद साधला. मात्र त्यातून आंदोलकांचे समाधान झाले नाही.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीस आणि जाहीर सभेस प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

याच पार्श्वभूमीवर सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगा..! सगळ्यांना एकदा पाडायचे का..? असे विचारल्यावर खूप मोठा प्रतिसाद जनतेमधून समोर आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेन्शन आले आहे.
धाराशिव मध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांना जाब विचारला. त्यानंतर आज रविवारी शरद पवार यांना मराठा आंदोलकांनी गाडी अडवून मराठा आरक्षण बाबत आपली भूमिका स्पष्ट करा असे म्हणत घोषणाबाजी केली.

पवार हे कुर्डूवाडीमार्गे बार्शीकडे जाताना वाटेत मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडविली आणि मराठा आरक्षणाबद्दल भूमिका विचारली. त्यावेळी पवार यांनी मोटारीच्या दरवाजाची काच खाली करून आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या.

Video



मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु समाधान न झालेल्या मराठा आंदोलकांनी, तुम्ही मराठा आरक्षणाला फक्त पाठिंबा देता, त्यावर प्रत्यक्ष सक्रिय भूमिका का घेत नाही.?असा सवाल केला. यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.


यावरून जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारा मराठा आंदोलक हे कोणत्या एका पक्षाला बांधील नसून सर्वच नेतेमंडळींना भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसून येत आहे.

Tags: Ajit pawar ncpmanoj Jarange Patilmaratha aarkshanSharad Pawarsolapur
Previous Post

Live : काँग्रेसच्या ‘दादा’चे भर उन्हात शक्ती प्रदर्शन ; हजारोंच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज..

Next Post

महापालिका ब्रेकिंग.! आयुक्तांच्या गाडीवर भीम आर्मीने ओतले गटारीचे पाणी

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

महापालिका ब्रेकिंग.! आयुक्तांच्या गाडीवर भीम आर्मीने ओतले गटारीचे पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.