mh 13 news network
सोलापूर – सोलापूरचे नामवंत चार्टर्ड अकाउंटंट सी.ए. राजगोपाल मिणियार यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या या न्यासाच्या बैठकीत वित्त समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिणियार हे गेली साडेचार वर्षे न्यासाचे वित्तीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी सांगितले की, “स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या आशीर्वादामुळेच ही नियुक्ती शक्य झाली.” त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








