Monday, September 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती

कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

MH 13 NEWS NETWORK

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम, १९४८ मधील काही तरतुदींमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

या दुरुस्ती अंतर्गत कलम ५४ मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कलम ५५ मध्ये विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे. यातील कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच कलम ६५ मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. त्याचबरोबर, आठवड्यात ४८ तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले आहे.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले की, कामगारांकडून जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्यासबंधीचे बदल यात सुचविण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ease of doing business च्या धोरणा अंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्वाचे आहेत. या बदलांमुळे उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता मिळेल तर कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजाचे वातावरण उपलब्ध होणार आहे

Previous Post

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यश

Next Post

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Next Post
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.