mh 13 news network
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन

मध्य रेल्वेची कमान सांभाळणारे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे वयाच्या ५६व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नुकतेच, १ ऑक्टोबर रोजी त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा पदभार स्वीकारला होता.
विजय कुमार यांना तत्काळ जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण रेल्वे प्रशासनात शोककळा पसरली असून, रेल्वे मंत्रालयापासून ते स्थानिक विभागांपर्यंत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूपूर्वी केवळ चार दिवसांपूर्वीच ते सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर आले होते. कर्तृत्व, शिस्त आणि सहृदय नेतृत्वामुळे ओळखले जाणारे विजय कुमार यांच्या जाण्याने रेल्वे सेवेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे








