MH 13NEWS NETWORK
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नेहरू नगर आणि परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी नुकतीच पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोट्यावधींच्या विकास निधीचा फुगवटा तयार करून प्रत्यक्षात मात्र कृती केली नसल्याचे त्यांनी जनसंवादात सांगितले.
पदयात्रेत स्थानिकांच्या गरजा आणि समस्यांविषयी संवाद पवार यांनी साधला.
संतोष पवार यांनी या पदयात्रेतून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी दिल्या.
त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकले. ते म्हणाले की, “आपल्या भागातील नागरिकांनी आजवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांना निवडून दिले आहे, तरीदेखील भागातील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्णच आहेत.”
पवारांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना सांगितले की, “ते फक्त किती कोटींचा विकास केला याचे मोठमोठे दावे करतात, परंतु प्रत्यक्षात स्थानिक विकासाच्या आघाडीवर काहीच कृती होताना दिसत नाही. या स्थितीत आता बदल घडवून आणण्याची गरज आहे.
“यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन करत पवार म्हणाले, “आगामी 20 नोव्हेंबर रोजी माझ्या अनुक्रमांक ‘१२’ समोरील ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या.” असे आवाहन केले.
या पदयात्रेदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मार्ग फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी स्थानिकांच्या समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली आणि आगामी निवडणुकीत संतोष पवार यांना संधी देण्याचे आवाहन केले.