MH 13 news Network
लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
सोलापूर/,ता. २ : लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन बुधवार ( दि.२) एप्रिल रोजी एस. व्ही. सी. एस वीरतपस्वी हायस्कुल येथे आयोजित करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उदघाट्न काशिपीठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सहायक पोलिस आयुक्त राजन माने,माजी नगरसेवक किरण देशमुख, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे,शिवानंद पाटील,शांतय्या स्वामी,संजू कोळी, सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्यावतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुट्टीदिवशी आरोग्य शिबीर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांचे कार्य असेच अविरत सुरु रहावे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले.
लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरु असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार संजय टोणपे यांनी केले.