माजी नगरसेवक अनंत नेता जाधव यांच्या वतीने सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात
सोलापूर – रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाचे औचित्य साधत माजी नगरसेवक मा. अनंत नेता जाधव यांच्या वतीने सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला प्रतीकात्मक राखी बांधून करण्यात आली.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ कसबे, युवासेनेचे धनाजी भोसले, माजी नगरसेवक विनायक विटकर, सचिन साळुंके, दत्तात्रय बडगंची यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भगिनींनी मान्यवरांना राखी बांधून भावबंध दृढ केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने भगिनी व नागरिक उपस्थित राहिले. या उपक्रमातून ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
