MH 13News Network
अतिरुद्र स्वाहाकारासाठी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात
हजारो भाविकांची होणार सोय : सद्गुरु श्री बसवारूढ महास्वामीजी मठात तयारी
सोलापूर : प्रतिनिधी
श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अतिदुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमासाठीची मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाचा त्रास भाविकांना होऊ नये याकरिता अत्याधुनिक पद्धतीचा वॉटरप्रूफ भव्य मंडप उभारण्यात येत आहे.
सोलापूर शहरात अतिरुद्र स्वाहाकार असा कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळे या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्याकरिता सत्संग मंडप, हवन मंडप, प्रसाद मंडप आदी मंडप उभारण्यात येत आहेत. सर्वांत मोठा सत्संग मंडप १०० बाय २२५ चौ. फुटांचा आहे. या मुख्य मंडपात सत्संग, शिवभस्मार्चन, पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रम चालणार आहेत. तर हवन मंडप ६० बाय ९०
चौ. फुटांच्या दुसऱ्या मंडपात हवन करण्यात येणार आहे. तर प्रसाद मंडप ५० बाय ८० फुटांचा असून त्यात महाप्रसाद देण्यात येणार आहे.
भाविकांनी सहभागी व्हावे
विश्व कल्याणासाठी, भारताच्या समृद्धीसाठी अतिरुद्र स्वाहाकार श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. ज्या भाविकांना हवनसाठी बसायचे आहे, त्यांनी मठाशी संपर्क साधावा. अशा भाविकांना संधी देण्यात येईल.
— श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, मठाधिपती, श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ, सोलापूर