mh 13 news network
सोलापूर : नॅशनल सायबर सिक्युरिटी अवेअरनेस मंथ (ऑक्टोबर 2025) या शासकीय उपक्रमाच्या अनुषंगाने, मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार (सर), पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले.

या वेळी श्री. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा, तसेच सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी ऑनलाईन फसवणूक, ओटीपी स्कॅम्स, फिशिंग लिंक यांसारख्या धोक्यांपासून बचावासाठी ‘विचार करा – पडताळा – मगच क्लिक करा’ असा व्यवहार्य संदेश दिला.








