Monday, October 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देवयज्ञ | सोलापूरकरांसाठी देवेंद्र’दादां’ना अजित’दादां’ची साथ..! प्रयत्नाला आले यश..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
देवयज्ञ | सोलापूरकरांसाठी देवेंद्र’दादां’ना अजित’दादां’ची साथ..! प्रयत्नाला आले यश..!
0
SHARES
2.9k
VIEWS
ShareShareShare

MH13News network

आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश – सोलापूर सिव्हिलसाठी नवे एमआरआय मशीन मंजूर!

सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नव्या एमआरआय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण बारा वर्षे जुनी असून कालबाह्य झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील एमआरआय मशीन बंद असल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. बाहेर खासगी रुग्णालयात महागडे एमआरआय स्कॅन करून आणण्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता. सोलापूरकरांसाठी जनसेवेलाच देव यज्ञ मानून नूतन आमदार देवेंद्र कोठे हे प्रयत्नशील आहेत. आजच्या पुणे येथील राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुग्णांसाठी शब्द टाकून तातडीने सिविल हॉस्पिटल साठी एमआरआय मशीन मंजूर करून घेतले.

सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिलसाठी नवे एमआरआय मशीन मंजूर करून घेतले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एमआरआय मशीनची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले.

सोलापूरच्या सिव्हिलमध्ये नव्या तंत्रासह एमआरआय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनीही बैठकीत मांडली. आमदार कोठे व अधिष्ठाता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.

सदर बैठकीला ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सोलापुरातील आरोग्य सुविधांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. नवीन एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हा माझ्यासाठी आशीर्वादच..!

सोलापूरकरांसाठी तसेच तालुका आणि परराज्यातील रुग्णांसाठी एक महत्त्वाची गरज पूर्ण झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परराज्यातील अनेक रुग्ण येतात. एम आर आय तपासणी महत्त्वाची असून अनेक वर्षापासूनची ही मागणी होती. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी वेळोवेळी चर्चा झाली होती. सोलापूरातल्या बैठकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. आज उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी एम आर आय बाबत चर्चा झाली आणि त्यांनी तात्काळ आदेश दिले. या महागड्या मशीन मधून खाजगी रुग्णालयातून तपासणी करणे सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाही. रुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या आशीर्वादामुळेच या प्रयत्नांना यश आले आहे.

श्री.देवेंद्र कोठे,आमदार

Tags: Ajit pawar ncpMLA Devendra KotheMRIsolapurSolapur Maharashtraदेव यज्ञसिव्हिल हॉस्पिटल
Previous Post

उजनी जलपर्यटन, दिव्यांगांसाठी निधी, शासकीय कार्यालयात सौर ऊर्जा आणि बरंच काही..! Ajitdada pawar

Next Post

ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या उत्सव अध्यक्षपदी महेश ठाकरे

Related Posts

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
Next Post
ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या उत्सव अध्यक्षपदी महेश ठाकरे

ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या उत्सव अध्यक्षपदी महेश ठाकरे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.