Saturday, May 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

पालकमंत्री हसन मुश्रीफ

१८१६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

कोल्हापूर, : श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करा. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन रोजगार निर्मितीला चालना द्या. तसेच या गावांच्या वैशिष्ट्यांचा विचार करुन त्याचा प्रचार प्रसार करा, जेणेकरुन जोतिबा डोंगर परिसरातील या गावांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधला जाईल, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर व परिसरातील गावांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमोर करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ .के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, रोहित तोंदले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री ज्योतिबा विकास प्राधिकरण अंतर्गत संपूर्ण ज्योतिबा डोंगराचा विकास करण्यात येणार असून त्यासोबतच जोतिबा डोंगराच्या परिसरातील 23 गावांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. हा आराखडा यापूर्वी शासनाला सादर करण्यात आला असून त्याची रक्कम 1530 कोटी रुपये इतकी होती. या आराखड्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्यामुळे  सुधारित आराखडा सध्या 1816 कोटी रकमेचा झाला आहे. वाढीव रकमेसह झालेल्या 1816 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली व हा आराखडा शासनाकडे फेरसादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, आराखडा तयार करताना डोंगर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व अन्य सर्व बाबींचा समावेश व्हावा. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीवर भर देवून अधिकाधिक परिपूर्णरित्या आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले.

हा आराखडा करताना डोंगराच्या आसपासच्या जंगल परिसराचा विचार करुन प्राणीसंग्रहालय तयार करता येईल का याचीही चाचपणी करा. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीवर भर द्या, अशा सूचना खासदार श्री. महाडिक यांनी केल्या.

ज्योतिबा डोंगरावर नारळ, फुले, दवणा अर्पण केला जातो. नारळ व निर्माल्याचा पुनर्वापर करुन बचत गटातील महिलांसाठी रोजगार निर्मिती होण्याबाबत विचार करा, असे खासदार श्री. माने यांनी सांगितले.

आर्ट अँड स्पेस स्टुडिओचे आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

Previous Post

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ….

Next Post

रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.