कोणत्याही घटकाचे हिसकावून ते अन्य कुणाला देणार नाही, हा शब्द सुद्धा आम्ही प्रारंभीपासून दिला होता आणि त्या शब्दाला जागण्याचे काम आम्ही केले.
राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर करण्यात आले.कोणत्याही घटकाचे हिसकावून ते अन्य कुणाला देणार नाही, हा शब्द सुद्धा आम्ही प्रारंभीपासून दिला होता आणि त्या शब्दाला जागण्याचे काम आम्ही केले. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशनानंतर व्यक्त केली आहे.
राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सारे आणि महायुती सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे. त्यामुळेच आजचा दिवस उगवला.
एकमताने हे विधेयक मंजूर केल्याबद्दल मी दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांचे, विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. मागासवर्ग आयोगाने सुद्धा प्रचंड परिश्रम करून वेळेत यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले, मी आयोगाचा सुद्धा आभारी आहे. या कामी असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हीच प्राथमिकता आधीही होती आणि तोच संकल्प आजही आहे.
कोणत्याही घटकाचे हिसकावून ते अन्य कुणाला देणार नाही, हा शब्द सुद्धा आम्ही प्रारंभीपासून दिला होता आणि त्या शब्दाला जागण्याचे काम आम्ही केले.
राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली आहे.
दरम्यान, एकमताने 10 टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय झालेला असून यावर मनोज जरांगे पाटील यांनी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलन सुरू राहणार असून उद्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
#Maharashtra #Mumbai #MarathaReservation #SpecialAdhiveshan #VidhanBhavan #DevendraFadnavis